पूल झाले मोकळे : पूर ओसरला

तपासणी नंतर सुरू होईल पूर्ववत वाहतूक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथील दगडी पूल शेजारील नवीन तसेच टेम्भुर्णी मार्गावरील अहिल्या पूल पुराच्या पाण्यातून खुले झाले आहेत. बांधकाम विभागाकडून त्याची तपासणी केली जाईल आनि त्यानंतर वाहतुकीसाठी आज सुरू होत आहेत.

दरम्यान सध्या येथील चांद्रभागेतील पाण्याची पातळी खालावली असुन सध्या भीमा नदी 2 लाख 14 हजार क्यूसेक्स ने वाहत आहे. तसेच संगम – नीरा नरसिंहपूर येथे भीमेची पातळी 59 हजार 823 क्यूसेक्स इतकी कमी झाली आहे.

ग्रामीण भागातील भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांचे ही रस्ते मोकळे होऊन दळणवळण पूर्वपदावर येत असल्याचे दिसते. भीमा नदीवरील दोन्ही पुलाची तपासणी केली जाणार आहे. नवीन पुलाची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभाग तर अहिल्या पुलाची तपासणी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाकडून केली जाणार आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्याबाबत वाहतूक नियंत्रण विभाग निर्णय घेईल असे सांगण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!