दोन्ही पुलावरून वाहतूक सुरू

नवीन पुलाचे पुरामुळे मोठे नुकसान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेले दोन दिवस बंद असलेली पंढरपूर ची वाहतूक सुरू झालेली आहे. अहिल्या पूल आणि नवीन पूल ही वाहतुकीसाठी सुरू झालेला आहे . भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे येथील दोन्ही मोठे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली होती.

शनिवारी पहाटे भीमा नदीची पाणी पातळी खालावल्याने पूल खुले झाले. मात्र दोन्ही पुलांची तपासणी केल्यानंतर दुपारी 12 वाजता दोन्ही पुलांवरून हलकी आणि जड वाहतूक सुरू झाली आहे.

नवीन पुलाचे मोठे नुकसान

आठ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे या महापुराने मोठे नुकसान झाले आहे. पुलाचे कठडे नादुरुस्त झाले असून लोखंडी ब्रेकटिंग वाहून गेले आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिला होता. त्यामुळे हा पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी वेळ लागल्याचे दिसून आले.

Leave a Reply

error: Content is protected !!