ब्राम्हण महासंघाचा समाधान अवताडेना पाठिंबा

आवताडे यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी केल्यामुळे समाजातून पाठिंबा

पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर ब्राह्मण महासंघाने भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सोमवार पंढरपूर ब्राम्हण महासंघाच्या सदस्य व सभासदांची बैठक सौ प्रणिती दामोदरे (भक्ती उत्पात )यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी ब्राम्हण समाज बांधव उपस्थित होते.


ब्राह्मण संघटन, युवक संघटन बांधणी, आगामी पंढरपूर प्राधिकरण साधक -बाधक परिणाम, सहल नियोजन आणि उमेद अंतर्गत तरुणांचे संघटन यावर चर्चा कृती आढावा घेण्यात आला. युवक संघटन 80 टक्के कार्य पूर्णत्वास गेले असून लवकरच युवक महोत्सव कार्यक्रम आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष चैतन्य केसकर यांनी दिली.

यावेळी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदार संघातील विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ठरले. आगामी काळात संघटनात तरुणांची संख्या विस्तार व उद्योगाबाबत ध्येय धोरणे याबाबत जिल्हा संघटक अमोल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.सहली व व्यवस्थापन अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली.

तालुका उपाध्यक्ष पिंटू कुलकर्णी, सचिव पदी मनोज राजगुरू तर संपर्कप्रमुख पदी ओंकार कुलकर्णी त.शेटफळ यांची नियुक्ती करण्यात आली. आभार जिल्हा महिला संघटक अमृता बडवे यांनी मानले, यावेळी जेष्ठ अशोक कुलकर्णी,प्रदीप कुलकर्णी आदी सह बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!