नंदूरबार जिल्ह्यात बस दरीत कोसळली : 5 ठार

35 जण जखमी : मृतांची संख्या वाढण्याची भीती

टीम : ईगल आय मीडिया

नंदुरबार जिल्ह्यातील खामचउंदर गावाजवळ सुमारे 40 फूट खोल दरीत खाजगी प्रवासी बस कोसळून झालेल्या अपघातात 5 जण ठार झालेत आणि 35 जण जखमी. ए एन आय ने दिलेल्या वृत्तनुसार मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या भीषण अपघातमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!