५४ प्रवाशांसह बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली

मध्यप्रदेशात भीषण अपघात : 4 जनांचा मृत्यू

बस कालव्यात कोसळल्यानंतर बघण्यासाठी जमलेली गर्दी

टीम : ईगल आय मीडिया

सतनाच्या दिशेने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने 30 फूट कालव्यात बस कोसळली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आलं. सात प्रवाशांना वाचवण्यात आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते.
अपघातानंत सात प्रवासी पोहत बाहेर आले तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे.


क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्य़ांशी चर्चा केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!