राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत विवाह सोहळ्यात उपस्थित होते
टीम : ईगल आय मीडिया
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन स्वतः भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी च्या आमदार सरोज अहेर यांच्या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यासह भुजबळ ही उपस्थित होते.
आज सकाळी भुुुजबळ यानी, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केली. तसंच माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे ट्वि्ट केले आहे.
राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. भुजबळांबरोबर शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर तसंच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी लग्नसोहळ्याला उपस्थित होते. आता छगन भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.