भीमा नदीत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पडला

ड्रायव्हर गंभीर जखमी : ट्रॅक्टरसह ट्रेलर आणि उसाचे नुकसान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

खेडभोसे (ता पंढरपूर ) येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पटवर्धन कुरोली बांधऱ्यावर चालकाचा ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या दोन ट्रेलरसह बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये चालक सतिष कडाळे ( रा.भोसे ,ता. पंढरपुर ) हा गँभिर जखमी झाला आहे. तर ट्रॅक्टर, ट्रेलर सह उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जड वाहातुकीला बंदी आहे. यापूर्वी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. मात्र पोलीस, पाटबंधारे प्रशासन दखल घेत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. तर बेसुमार वाळू, मुरूम, माती, ऊस, खडी, दगड आशा जड वाहतुकी मुळे बंधाऱ्याचे ही नुकसान होत आहे. या प्रकारानंतर तरी प्रशासन दखल घेणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत

                             खेडभोसे येथील शेतकरी धनाजी विठ्ठल साळुंखे यांचा ट्रॅक्टर ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. पटवर्धन कुरोली बंधाऱ्यावर आल्यानंतर दोन्ही ट्रेलर मध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरल्याने सरळ बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात पडला. त्यामुळे ट्रॅक्टर चालक तब्बल दोन तास उसाने भरलेल्या ट्रेलर खाली अडकून पडला होता. नागरिकांनी स्वता नदीपात्रात उतरत ट्रेलर मधील ऊस ऊस बाजूला करून उसाखली अडकलेला ट्रॅक्टर व चालकाला मोकळं केलं. त्यानंतर पालखी मार्गाच्या कामावर असलेलं क्रेन बोलावून ट्रॅक्टर व चालकाला बाहेर काढले.

Leave a Reply

error: Content is protected !!