भीमा नदीच्या बंधाऱ्यात ऊस भरलेला ट्रेलर पडला

फोटो   पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील भीमा नदीवरील बंधार्‍याच्या उतारावर उसाचा पलटी झालेला ट्रेलर.

पंढरपूर : ईगल आय न्यूज

पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील भीमा नदीच्या बंधार्‍यावर उसाचा भरलेला ट्रेलर पलटी झाला आहे. विशेष म्हणजे या दुर्घटनेत कोणत्या ही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली आणी पिराची कुरोली या दोन्ही गावांच्या मध्ये भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या परिसरातील सर्व प्रकारची रहदारी याच बंधाऱ्यावरून चालते आहे. हलक्या वाहनांसाठी बंधारा योग्य असला तरीही ऊस आणि इतर स्वरूपाची अवजड वाहतूकही याच बंधाऱ्यावरून चालू असते. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असल्याने या परिसरातील उस वाहतूक या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात सुरू आहे.


 दोन्हीही बाजूला चढ असताना सुध्दा एकाचवेळी सर्रास दोन ट्रेलरच्या भरून  वाहतूक केली जाते.  सोमवारी दुपारी  अडीच वाजण्याच्या सुमारास पटवर्धन कुरोली हुन निघालेल्या टॅक्टर च्या पाठीमागील ट्रेलरचे चाक निघून गेल्याने  ट्रेलर बंधार्‍यावरच पलटी झाला. सुदैवाने ट्रॅक्टर व ट्रेलर पाण्याने भरलेल्या बंधार्‍यात पडला नाही. त्यामुळे मोठा अपघात टळला. 


या बंधार्‍यास संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. या बंधार्‍यावरून जड वाहनांची अनधिकृत वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते.  पाटबंधारे विभागाचे जड वाहतुकीकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे.  जड वाहने सतत जाऊ लागली, तर बंधार्‍यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे  या बंधार्‍यावरून जडवाहनास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे. या बंधार्‍यावर पटवर्धन कुरोली , पिराची कुरोली सह आसपासच्या सात ते आठ गावातील  वाहतूक याच बंधाऱ्यावरून असल्याने संबंधित विभागाने जड वाहतुकीस निर्बंध घालावेत, अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!