600 फूट खोल दरीत कार कोसळली : 2 जण ठार

आखाड एन्जॉय करणे पडले महागात : 1 जण गंभीर जखमी

टीम : ईगल आय मीडिया

पन्हाळ्याजवळील मसाई पठाराच्या उत्तरेला वेखंडवाडीजवळ कार दरीत कोसळून 2 ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. वेखंडवाडी येथील साळवणदरा या परिसरात मोठ्या कडयावरून मारुती स्विफ्ट कार दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पक लिगाडे आणि अमित गुप्ता असे ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर जखमी युवकावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इचलकरंजी येथील निखिल युवराज शिंगे (रा. कबनूर) अमित गुप्ता व पुष्पम लिगाडे हे वर्षापर्यटनासाठी मसाई पठारावर आले होते. पावसात भिजत आनंद घेत ते सायंकाळी पठारावर फिरत होते. त्यांना पठारावरील कड्याचा अंदाज आला नाही. त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी ( mh – 12 jm – 3956) कड्यावरून वेखंडवाडीच्या दिशेने सुमारे पाचशे ते सहाशे फूट खोल दरीत कोसळली.

शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. कबनूर येथील हे तीन तरुण आखाडी साजरा करण्यासाठी मसाई पठारावर गेले होते. पावसात भिजत आनंद घेत ते सायंकाळी पठारावर फिरत होते. त्यांना पठारावरील कड्याचा अंदाज आला नाही आणि त्यांची कार दरीत कोसळली.

दरम्यान, वेखंडवाडी येथील ग्रामस्थांनी या तिघांनाही स्ट्रेचरच्या सहाय्याने जंगल व दरीतून रस्त्यावर आणले. कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए. पी. काशिद घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

Leave a Reply

error: Content is protected !!