उमदी जवळ 3 भाविकांना भरधाव कार ने चिरडले

हुलजंती येथील यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उमदी -मंगळवेढा मार्गावर भरधाव कार ने चिरडल्याने 3 भाविक जागीच ठार झाले तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. आज सकाळी उमदी ( ता.जत, जि. सांगली ) जवळ हा अपघात झाला आहे.

हुलजंती ( ता.मंगळवेढा ) येथील विठ्ठल बिरुदेव यात्रेसाठी कर्नाटकातील भाविक येत होते. उमदी पासून 2 किमी अंतरावर आले असता पुण्याहून रायचूर ( कर्नाटक ) कडे निघालेल्या कार ( एम एच. 12 एम.डब्ल्यू 8598 ) चा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटून कार समोरून येणाऱ्या भाविकांच्या अंगावर गेली.

या अपघातात बसप्पा दुर्गप्पा चिंचवडे ( वय 32 वर्षे, रा. यादभावी , ता.लिंगसुर, विजापूर ), नागप्पा सोमन्ना अचनळ (वय 34, देवभूसर ) म्हणाप्पा दुर्गप्पा गोंदीकल ( वय 40 वर्षे ) हे तिघेजण जागीच ठार झाले. या अपघातात एका मोटारसायकल स्वारसही धडक बसली असून तो जखमी झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!