“त्या ” कार चालकाचा मृतदेह सापडला : दोघेजण बचावले !

निमगाव – दहिवली मार्गावर वाहून गेली होती कार

टीम : ईगल आय मीडिया

निमगाव – दहिवली ( ता. माढा ) या मार्गावर वाहून गेलेल्या कार मधील दोन जण वाचले तर चालकाचा मृत्यू झाला आहे. आज ( गुरुवारी ) पाणी कमी झाल्यावर कार मधून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या कारचा वाहून जाताना काढलेला व्हीडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हाच तो थरारक व्हीडिओ : पहा आणि चॅनेल subscribe करा

निमगाव – दहिवली या रस्त्यावरील पुला वरून पाणी वाहत असताना दि.14 ऑक्टोबर रोजी 13.15 वाजण्याच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर कार ( क्रमांक MH – 12 CP- 4969 ) चालकाने पाण्यात घालून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अंदाज न येता वाहन चालविल्याने गाडी वाहून गेली होती.

या कारमध्ये 3 जण होते त्यापैकी 2 जण सुखरूप बाहेर पडले मात्र चालक शिवाजी भगवानराव यादव ( वय 38 वर्ष रा. आंबेजोगाई ) हा गाडीमध्ये अडकल्याने पाण्यामध्ये वाहत गेला आणि मयत झाला आहे.
आज ( गुरुवारी ) पाण्याची पातळी कमी झाल्याने कार सापडली व त्यातून मयत चालकास बाहेर काढून टेम्भुर्णी सरकारी दवाखाना येथे पाठवले आहे. सदर घटनेबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत दाखल आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!