पुराच्या पाण्यात कार गेली वाहून

एक जण वाचला, दोन जण बेपत्ता

संबंधित बातमीचा व्हीडिओ पहा !

टीम : ईगल आय मीडिया

नांदेड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला आहे. आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास मुखेड तालुक्यात मोती नाल्यास आलेल्या पुराच्या पाण्यात दोन व्यक्तीं सह एक कार वाहून गेली. या कारमध्ये तीन व्यक्ती होते त्या पैकी दोन व्यक्ती कारसह वाहून गेले आणि एका व्यक्तीने झाडाचा आधार घेत स्वतःचा जिव वाचवला.

या व्यक्तीला वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कार बेपत्ता झाली असून कार आणि कारमधील व्यक्तींचा शोध घेण्याच काम सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाला मदत पुरविण्यास अडचणी येत आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

जोरदार पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सकाळी मोठी वाढ झाली असून नांदेडमध्ये सखल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सकाळी साडे आठ वाजता उसंत दिली आहे. त्यामुळे आता पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!