नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

वीर धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता

पंढरपूर : ईगल आय मीडिया

निरेच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

ही आजची बातमी : वाचली का ?

उद्या दुपारनंतर वीर मधून पाणी सोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निरा देवघर धरणातून पाणी वीर धरणात येते. सध्या वीर धरणात 50 टक्के आणि नीरा देवघर धरणांत ही 69 टक्केहून अधिक पाणी साठा आहे. तर सुमारे 50 हजार क्यूसेक्स ने आवक आहे. मात्र निरेच्या खोऱ्यात अतिवृष्टी सुरू असल्याने वीर धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

त्यामुळे वीर धरणातून पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जाईल. खंडाळा, फलटण, माळशिरस, बारामती, पंढरपूर, तालुक्यातील नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!