टीम : ईगल आय मीडिया
दक्षिण सोलापूर तालुक्यात सोलापूर- कर्जाळ रोडवर भरधाव वेगात आलेला सिमेंटचा टँकर (क्रमांक Mh-45 A- 8855 ) चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहीरीत गेला आहे. दरम्यान चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी टाकल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
दक्षिण सोलापूर तालुक्यात वळसंग जवळ सोलापूर ते कर्जाळ या रस्त्याचे काम सुरु आहे. आज ( रविवार, दि 19 ) रोजी सकाळी 9 च्या सुमारास कर्जाळ परिसरात हा विचित्र अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्जाळ पोलिस पाटलांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, भरधाव वेगाने आलेला सिमेंट टँकर थेट विहीर गेला आहे. यावेळी चालकाने मात्र वेळीच सावध होऊन उडी टाकली असल्याचे समजते. चालक पसार झाल्याचे दिसत असून या अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही. या अपघाताची माहिती समजताच मदतीसाठी अनेकजण धावले आहेत.