श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रात्र उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री उशिरा एम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे. शहा यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अमित शहा याना गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. उपचारानंतर त्यांचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीही श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने अमित शहा यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.
गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये न्यूरो टॉवर मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
करोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित शहा यांनी काही काळ हॉस्पिटलमध्येत रहावं. तिथेच त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असे एम्समधील सूत्रानी सांगितले.