मुंबई : ईगल आय मीडिया
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांमुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मोठी मदत होते. साक्षीदार नसेल किंवा साक्षीदाराने चुकीची भूमिका घेतली तर अनेकदा आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही. त्यामुळे साक्षीदार अर्थात आय विटनेस पोलीस तपासकामातमहत्वपूर्ण ठरतो. त्यामुळे आय विटनेस ऍप आणि वेबसाईटची पोलीस यंत्रणेला मोठी मदत होईल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
बांद्रा संविधान निवासस्थानी आय विटनेस या वेबसाईटचे आणि ऍप चे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. या वेबसाईटची निर्मिती अरुण बाबुराव गवळी या युवकाने केली असून त्यांना रिपाइं चे ज्येष्ठ नेते आनंदराव साळवे यांनी मार्गदर्शन केले आहे. या वेबसाईट चे सहसंस्थापक वैभव साळवे; प्रवीण प्रधान;रितेश माळवे हे आहेत.
आय विटनेस हे पोलीस आणि नागरिकांना ही उपयोगी ठरणारे ऍप आणि वेबसाईट असून या आय विटनेस चा पोलीस यंत्रणेला कसा उपयोग करता येऊ शकतो ते तपासून निर्णय घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवुन करणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी केले.