खा. सुनील तटकरे यांनाही कोरोना
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात ए एन आय ने वृत्त दिले असून ना. आठवले यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचे सांगितले आहे.
सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते.
त्याचबरोबर आठवले यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे, तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि रायगड चे खा सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.तटकरे यांचीही तब्येत चांगली असून खबरदारी म्हणून खा.तटकरे यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एकाचवेळी उपमुख्यमंत्री अजित पावर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा सुनील तटकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अशा नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.