11 वी प्रवेश : Cet परीक्षा वेबसाईट बंद

शिक्षण मंडळाचा खुलासा

संबंधित वृत्त वाचा !

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील इयत्ता11 वीच्या प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या cet परीक्षेसाठी अर्ज भरण्याची वेबसाईट तांत्रिक कारणामुळे बंद ठेवण्यात आली असून ती व्यवस्था लवकरच पूर्ववत करण्यात येईल असा खुलासा आज राज्य शिक्षण मंडळाने केला आहे.

हे वृत्त वाचा !

इयत्ता10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 त प्रवेश देण्यासाठी cet परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल आणि त्यासाठी 20 जुलै ते 26 जुलै दरम्यान Http/cet.mh.ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरला येईल अशी घोषणा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केली होती.

त्यानुसार online अर्ज भरण्याच्या वेळेस Http/cet.mh.ssc.ac.in ही वेबसाईट हँग होऊन कोल्हापूर, पुणेसह इतरही काही शहरात विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे तांत्रिक दोष दूर करण्यासाठी मंडळाने Http/cet.mh.ssc.ac.in ही वेबसाईट बंद करण्यात येत असल्याचे प्रकटन जाहीर केले आहे.

तसेच लवकरच पुरेसा कालावधी देऊन अर्ज भरण्याची व्यवस्था केली जाईल असेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!