सोलापूर जिल्ह्यात C E T होणार !

11 प्रवेशासाठी C E T ला प्राधान्य

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यात 10 वी पास विद्यार्थ्यांपेक्षा 11 वी प्रवेश जागा जास्त असल्या तरीही शिक्षण मंडळाच्या धोरणानुसार cet परीक्षा होणार आहे. Cet देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य असणार असून, त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इयत्ता 10 वीच्या निकालानुसार सोलापूर जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 11 वीच्या प्रवेश जागा अधिक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात cet ची गरज लागणार नाही अशा प्रकारच्या बातम्या काही दैनिकांतून प्रकाशित झाल्या होत्या. मात्र 10 वीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे cet घेऊन 11 वीला प्रवेश दिला जावा असे धोरण शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

मात्र सोलापूर जिल्ह्यात 11 वी प्रवेशासाठी सुमारे 76 हजार जागा आहेत आणि 10 वी पास विद्यार्थी 65 हजार आहेत. त्यामुळे ठराविक महाविद्यालयातच प्रवेशासाठी गोंधळ होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अगोदर cet विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि त्यानंतर cet न दिलेल्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश मिळेल, यासाठी cet परीक्षा सोलापूर जिल्ह्यात ही घेण्यात येणार आहे.

शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार 21 ऑगस्ट रोजी cet परीक्षा राज्यासोबत जिल्ह्यात ही होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मंडळाचे संकेतस्थळ सध्या तांत्रिक कारणाने बंद आहे. लवकरच ते सूरु होईल. त्यावेळी विद्यार्थ्यांनी मुदतीत cet परीक्षेसाठी अर्ज भरावा, अन्यथा त्यांना cet अभावी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण होऊ शकते, असेही सूत्रांकडून सांगण्यात येते.

2 thoughts on “सोलापूर जिल्ह्यात C E T होणार !

Leave a Reply

error: Content is protected !!