खा. सुप्रिया सुळे यांच्यासह दिग्गजांकडून विचारपूस
पुणे : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रकृती सुधारली असल्याचेनिकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. चाकणकर यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे तातडीने सिंहगड रोड येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाला होता, मात्र पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थ वाटल्याने त्यांना रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह अनेक सामान्य कार्यकर्ते त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे या सातत्यानं हॉस्पिटलमधील प्रशासनाच्या संपर्कात आहेत.राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या म्हणून रुपाली चाकणकर यांना राज्यात ओळखलं जातं. पुणे शहराध्यक्ष पासुन ते महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष पर्यंतचा रुपाली चाकणकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
चाकणकर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे व खासदार वंदनाताई चव्हाण या सातत्याने रुपाली चाकणकर यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत. हॉस्पिटलमधील प्रशासन,ट्रिटमेंट करणारे डॉक्टर यांच्याशी स्वतः सुप्रिया सुळे वैयक्तिक संपर्कात असुन वेळोवेळी प्रकृतीची माहिती घेतात. त्यांची प्रकृती सुधारली असल्याचेही चाकणकर कुटुंबियांकडून सांगितले जात आहे.