पंढरीत चंद्रभागा तिरी घाटाची भिंत कोसळली

काही लोक अडकल्याची भीती : मदत कार्य सुरू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या कुंभार घाटाचे बांधकाम सुरू असून त्या घाटाची भिंत पावसामुळे कोसळली आहे. यामध्ये काही लोक अडकल्याची भीती असून जेसीबी, रुग्णवाहिका आणी मदत बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

व्हीडिओपहा आणि चॅनेल subscribe करा


चंद्रभागा नदी तीरवर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत्त आज दुपारी अडीच वाजता कोसळली.
पावसामुळे या भिंत्तीच्या आडोशाला उभे राहिलेले काही लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खास करुन घाटांवर भीक मागणारे भिकारी या भित्तीच्या आडोशाला होते असे बोललेे जाते.


भित्त पडल्यानंतर त्यांचा मोठा आक्रोश सुरु होता.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे जेसीबी व रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले घटनेचे वृत्त समजताच रुग्णवाहिका, जेसीबी बोलावून मदत कार्य सुरू केले आहे.

पंढरपूर येथे चंद्रभागा नदी तीरावर नवीन घाट बांधण्याचे काम सुरू आहे. आज दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या घाटाच्या कामाची भिंत आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळली.

One thought on “पंढरीत चंद्रभागा तिरी घाटाची भिंत कोसळली

Leave a Reply

error: Content is protected !!