सहकार शिरोमणी : 6 लाख टन उस गाळप करणार


कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

फोटो
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे.

पंढरपूर : ईगल आय न्यूज


 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची मा.अधिमंडळाची  31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संस्थेचे अध्यक्ष कल्याण वसंतराव काळे यांचे अध्यक्षतेखाली खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ सभासद  व  प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचे  हस्ते करण्यात आले. 


यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी, गळीत हंगाम 2022-23 करीता 6 लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट् ठेवण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुक मशिनरी आधुनिकीकरण व ॲटोमायझेशन केली आहे. त्यामुळे चालु गळीत हंगामामध्ये कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणेत येणार असून, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास देवुन सहकार्य करण्याचे आवाहन केले.  तसेच गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचे एफआरपी प्रमाणे असणारी शेतकऱ्यांची बिले दिपावली पुर्वी देण्यात येणार असल्याचे सांगितले.


कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी,  वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील सर्व विषयाचे वाचन केले. त्यास उपस्थित सर्व सभासदांनी आवाजी मताने मंजुरी दिली. कार्यक्रमास आलेल्या सर्व सभासद व मान्यवरांचे स्वागत कारखान्याचे तज्ञ संचालक नागेश फाटे यांनी केले.


यावेळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, गोरख जाधव, बिभिषण पवार, भारत कोळेकर, अण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, ॲङ तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, प्रदिप निर्मळ, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर अरुण बागल, मा.संचालक प्रताप म्हेत्रे, विठ्ठल कारखान्याचे मा.संचालक उत्तम नाईकनवरे, यशवंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, महादेव देठे, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुत्र संचलन समाधान काळे यांनी केले तर सभेस उपस्थितांचे आभार संचालक सुधाकर कवडे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!