घाट दुर्घटना प्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार की मोकळे सोडणार ?


पंढरपूर : ईगल आय मीडिया बुधवारी येथील चंद्रभागा वाळवंटाच्या बाजूला घाटाचे काम सुरू असताना भिंत कोसळून 6 जण जागीच ठार झाले आहेत. या प्रकरणी घाट बांधकाम ठेका घेतलेल्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदीप गोपाल चमारिया ( वय 20 , रा. जुळे सोलापूर ) यांनी आरोपी ठेकेदार अशोक भागवत इंगोले आणि हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्शन ( बीड ) यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, या बांधकामाकडे आणि त्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या करणाऱ्या संबंधित अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्याविरोधात ही कारवाई होणार की त्यांना वाचवले जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बुधवार ( दि.14 ऑक्टोबर ) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुंभार घाट, चंद्रभागा घाट पंढरपुर येथे सुरू असलेल्या बांधकामाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत मंगेश गोपाळ अभंगराव (वय 30 ), गोपाळ लक्ष्मण अभंगराव ( वय 70 ) राधा गोपाळ अभंगराव ( वय 60 तिघे रा. कुंभार घाट ) संग्राम उमेश जगताप ( वय 14 रा भडीशेगाव ता.पंढरपुर ) तसेच इतर 2 अनोळखी महिला ( वय 55 ते 60 ), अनोळखी महिला ( वय 50 ते 55 ) यांचा मृत्यू झालेला आहे.


यातील आरोपी अशोक भागवत इंगोले यांनी हुले ए बी आय कन्स्ट्रक्शन कंपनी सह चंद्रभागा नदी लगत कुंभार घाट पंढरपुर येथे घाट निर्मितीचा ठेका घेतला आहे. त्या कामावर यातील फिर्यादी व साक्षीदार हे देखरेख करत होते. त्यावेळी फिर्यादी त्यांनी यातील आरोपी ठेकेदार यांना घाट भिंतीची उंची जास्त असलेने त्यांना आवश्यक सुरक्षा कठडे ,दर्शक फलक बोर्ड ,रेलिंग ग्रील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याबाबत व उर्वरित राहिलेले बांधकाम पूर्ण करण्याबाबत लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या. तरीही त्यांनी त्यात हलगर्जीपणा केला.

त्यामुळेच मयत व्यक्तींच्या अंगावर घाट बांधकामाची भराव केलेले दगडे, चुना, माती, वाळू कोसळली आणि त्याखाली दबून त्यांचे सर्वांचा मृत्यू झाला आहे. तसेच घाट बांधकामाच्या नुकसानीस कारणीभूत झाले आहेत अशी फिर्याद शहर पोलिसात दिली आहे. त्यानुसार भा.द.वि.क 304(अ) 427,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि.शिवाजी करे हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!