#Cm नाही pm बदला !

भाजपच्या अपयशावर बोट ठेवणारी ट्विटरवर काँग्रेस ची मोहीम

टीम : ईगल आय मीडिया

भाजपाने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मागील सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामुळेच आता काँग्रेसने या वरुन भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहींPMबदलो ही मोहीम सुरु केली असून आज दिवसभर ट्विटरवर हा पॉलिटिकल ट्रेंड टॉप वर राहिला आहे. तब्बल 53 हजारांहून अधिक नेटकर्यांनी काँग्रेसच्या या मोहिमेला पाठिंबा दर्शवत ट्विटर ट्रेंड चालवला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक एक वर्षावर असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची माळ भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या गळ्यात पडली आहे.  या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने cm बदलून उपयोग नाही pm बदला अशी मोहीम चालवली आहे. भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोला काँग्रेसने या माध्यमातून लगावला आहे. या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?, असं काँग्रेसने अन्य एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलंय. तसेच मोदी सरकारच्या विविध क्षेत्रातील अपयशावर बोट ठेवत काँग्रेस आणि समर्थकांनी cm नाही pm बदला ही मोहीम चालवली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!