खेडभाळवणी येथील छत्रपती गणेश मंडळांचा अनोखा उपक्रम

यंदा गणेशोत्सव साजरा न करता केले सामाजिक कार्य

शेळवे : संभाजी वाघुले

खेडभाळवणी (ता.पंढरपुर) येथील छञपती गणेश तरुण मंडलाने यावर्षी कोरोनाच्या साथी मुळे नेहमीप्रमाणे गणेशोत्सव न करता तो रद्द करून सामाजिक कार्यक्रम राबवला.

खेडभाळवणी (शिवाजीनगर) या मंडळाकडून दर वर्षी किर्तन,भारुड,व्याख्यान,वकृत्व स्पर्धा, लहान मुलांच्या वेग वेगळ्या स्पर्धा असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. डाॅल्बी व अनावश्यक खर्चाला वगळुन समाजासाठी मंडळ काम करीत असते.

यावर्षी कोरोना सारख्या महा भयंकर विषाणुने थैमान घातलेले आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या सहकार्याने शिवाजी नगर स्टाॅप ते शेळवे काॅलेजपर्यंत दोन किलोमीटर परिसरातील रस्त्यालगत असलेली काटेरी झुडपे काढण्याचे काम या खेडभाळवणी येथील छञपती गणेश मंडळाने केले आहे .

सर्व खेडभाळवणी व परिसरातील ग्रामस्थांमधुन या छत्रपती गणेश तरुण मंडळ शिवाजी नगर या गणेश मंडळा चे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!