घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण व शिवगौरव पुरस्कार प्रदान समारंभ

पंढरपूर : eagle eye news
, की शिवरायांना आपण दैवत मानतो, शिवरायांची जयंती साजरी करताना अलीकडच्या काळात ज्या चुकीच्या गोष्टी रूढ होऊ पाहत आहेत, त्या टाळल्या पाहिजेत व शिवरायांच्या विचारांना महत्त्व देऊन ते विचार जनमानसात रुजविले पाहिजेत, तरच आपण नव्या महाराष्ट्राची उभारणी करू शकतो. छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने अनेक उपक्रम होतात. या उपक्रमातून शिवरायांचे चरित्र व विचार आजच्या पिढीच्या डोक्यात रुजविले पाहिजेत असे मत युटोपियन शुगरचे चेअरमन उमेशराव परिचारक यांनी व्यक्त केले.

ते राणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक जीवन पाटील उपस्थित होते. शिवरायांच्या ३९४ व्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ व शिवगौरव पुरस्कार प्रदान समारंभाच्या निमित्ताने बोलताना उमेशराव परिचारक म्हणाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महेश भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रताप चव्हाण यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. डॉ सचिन लादे व मंदार केसकर यांनी शिवगौरव पुरस्कार प्राप्त डॉ.शितल शहा (आरोग्य), सुधाकर पिसे(शिक्षण), शिवाजीराव वाघमारे (साहित्य), सौ.मुक्ता म्हसे(आदर्श माता), दीपक टापरे (समाजसेवा), नागेश साळुंखे (क्रीडा) व रनर्स ग्रुप (आदर्श संस्था) यांचा परिचय करून दिला.
या प्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर यांनी शिवरायांच्या जीवनातून आदर्श घेऊन समाज व राष्ट्राच्या उपयोगी कसे पडावे याबाबतचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना जीवन पाटील सरांनी शिवरायांच्या जीवनातील अनेक उदाहरणे दिली. शिव गौरव पुरस्कार प्राप्त दीपक टापरे यांनी तर स्पर्धेच्या परीक्षकांच्या वतीने दीपक इरकल यांनी मनोगते व्यक्त केली. घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेची बक्षिसे याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली. सचिन कदम यांनी याबाबतची माहिती दिली.
या स्पर्धेमध्ये प्रथम- श्रेयश तानाजी गुंड, द्वितीय- श्रेयश आनंद शिंदे, तृतीय- तेजस्विनी अमरसिंह चव्हाण, उत्तेजनार्थ – रुद्र आनंदा चव्हाण, सिद्धी गजानन शेटे, वरद विवेक बडवे या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली. कार्यक्रमाच्या शेवटी दिगंबर गडम यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मोरे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रीकांत बडवे प्रथमेश वांगीकर पराग जागीरदार विश्वंभर पाटील उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा.प्रशांत पाटील, पिंटू शिंगण, प्रदीप बोराटे, डॉ.आनंद शिंदे, प्रवीण देशपांडे, अविनाश कोळी, शहाजी देशमुख,दिनेश गावडे,प्रवीण सुरवसे,कैलास कारंडे,श्याम गोगाव, डॉ.प्रशांत ठाकरे,आनंद नगरकर, अमर गायकवाड,प्रसाद कुलकर्णी, किशोर मोळक,रविकांत कदम, माऊली निकते,ज्ञानेश्वर गवळी, सचिन लोळगे,रविराज सोनार, सोमनाथ माने,घनश्याम धुमाळ,अमरसिंह चव्हाण यांनी परिश्रम घेतले.