रोख रकमेची बक्षिसे : नावनोंदणी करण्याचे आवाहन
पंढरपूर : eagle eye news
पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घरो -घरी साजरा व्हायला हवा या हेतूने पंढरपूर येथील राणा ग्रुपच्या वतीने घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा सुरु केली आहे. यंदाचे या स्पर्धेचे ८ वे वर्ष असून शिवप्रेमींनी स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी, उत्कृष्ट सजावट कर्त्या शिवप्रेमींना रोख रकमेचे बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती महाराणा प्रताप ग्रुपचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी दिली.
यंदाचे या स्पर्धेचे ८ वे वर्ष असून यंदाही या स्पर्धेत शिव प्रेमींनी सहभागी व्हावे, नाव नोंदणी ज्ञानेश्वर मोरे (९०११५७७६७), सचिन कदम (७५८८५७४५११), रविकांत कदम(९८२२०६३५०३), आनंद नगरकर (९९२१५३०६४०) यांच्याकडे करावी, असे आवाहन राणा प्रताप मंडळाचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी केले आहे.
घरोघरी गणेशोत्सव, गौराई सण, दिवाळीत मुलांकडून होणाऱ्या किल्ले उभारणी केली जाते, त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घरगुती शिव जयंती साजरी करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते.