चिंचणी त उभा राहणार भव्य कलादालन

वारी आणि तमाशा याचे अभ्यासपूर्ण प्रदर्शन असणार

पंढरपूर : ईगल आय न्यूज

पंढरीच्या वाटेवर आसणाऱ्या चिंचणी या वैशिष्टय़पूर्ण गावात ‘वारी आणि तमाशा’ यांच्यावर अभ्यासित केलेल्या आत्मभान कलादालनाची उभारणी करण्यात येणार आहे. यंदा पालखी सोहळय़ाच्या काळात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यातील ग्रामीण कृषि पर्यटनामुळे आदर्श ठरलेल्या चिंचणी गावात आणखी एक वैशिषट्यपूर्ण प्रकल्प उभा राहत आहे. यासंदर्भात पुण्यातून अधिकृत पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात बली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, निशा शाळगावकर, केशव कासार, नीलिमा कढे, सचिन निंबाळकर यांची उपस्थित होती.

याबाबत बोलताना भंडारे म्हणाले, आत्मभान कलादालन प्रकल्पाचा पायाभूत आधार हे ‘वारी आणि तमाशा’ यावरील दोन मौलिक संशोधनात्मक फोटो अल्बम आहेत. या संशोधनात भाषिक अभिव्यक्तीइतकीच दृश्य-कलात्मक मांडणी महत्त्वाची आहे. ‘आत्मभान ट्रस्ट र्फे उभे राहणारे हे कलादालन म्हणजे ‘तमाशा आणि वारी’ या दोन परंपरांच्या दृश्य-कलात्मक जतन व संवर्धनाचा आरंभबिंदू आहे.आत्मभान म्युझियमची संकल्पना व्यापक चर्चा-विनिमयामधून आकाराला येत गेली.

महाराष्ट्रातील अनेक जाणकार अभ्यासकांनी ही कल्पना उचलून धरली. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे जेष्ठ भाष्यकार आणि आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, जेष्ठ मराठी साहित्यिक आणि चित्रकार-कवी वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांचे विशेष प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!