चिंचणी पुर्न. ग्राम पर्यटनाचे महत्वाचे केंद्र : आ. देशमुख


पर्यटन दिनानित्त चिंचणीत झाली सोलापूर सोशल फाऊंडेशनची बैठक


पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्हा पर्यटनास अनुकूल असून चिंचणी पुर्न हे गाव ग्रामीण पर्यटनाचे महत्वाचे केंद्र बनत असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटनदिनाचे औचित्याने सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चिंचणीपुर्न ( ता.पंढरपूर ) येथे बोलत होती. यावेळी सोशल फाऊंडेशनच्या द्विवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले .


पुढे बोलताना आ.सुभाष देशमुख यांनी, आर्थिक संपन्नताच शोषण थांबवेल असे सांगून गावाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तरुणाईने गावाचा विकास करण्याचे अवाहन करुन तरुणांना सोशल फाऊंडेशन सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्याचे मार्कटिंग करुन जगात वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असून त्यास शहरी माणसांनी मदत करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली.


पंढरपूर तालुक्यातील चिंचणी पुर्नवसन या निसर्गसंपन्न गावात महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल फाऊंडेशनच्या बैठकीच्या निमित्ताने ग्रामपर्यटनाचा आनंद घेऊन चिंचणी ग्रामस्थांच्या ग्रामीण भोजनाचा आस्वाद घेतला.


सोशल फाऊंडेशनच्या या सल्लागार समितीच्या बैठकीत उद्योगपती अभिजीत पाटिल यांनी सोशल फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेऊन समृद्ध गाव योजना राबविण्याचे अवाहन केले. मार्केटिंग विषयी उद्योगपती अजीत कंडरे, भुषण कुलकर्णी ,तारासिंग राठोड,माजी डीवाय एस पी गणपत माडगुळकर ,अमीत जैन यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक व विविध प्रशिक्षणे व कार्यशाळेची माहिती शिवाजी पवार यांनी दिली. अंकूश पडवळे यांनी हरितग्रामची संकल्पना सांगितली.पुणे-मुंबई येथील अन्नपूर्णा योजनेची माहिती मनियार यांनी दिली. कृषी पर्यटनाविषयी मोहन अनपट यांनी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक उपक्रमांची माहिती विजय कुचेकर यांनी दिली.आभार विजय पाटिल यांनी मानले. यावेळी संचालिका पूर्वा वाघमारे ,पंचायत समिती सदस्या पल्लवी यलमार, विपूल लावंड, श्रीधर यलमार व सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रातून मोठ्या संखेने सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!