कोरोनाचे 123 नवे रुग्ण आणि 3 मृत्यू
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या बाहेरील लोकांच्या गर्दीचा परिणाम पंढरपूर शहरात दिसू लागला आहे. आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात तब्बल 123 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच 3 जनांचा मृत्यू झालेला आहे.
आषाढी यात्रा 4 दिवसांवर आलेली असताना पंढरपूर शहरात गर्दी वाढू लागलेली आहे. राज्याच्या विविध भागातून वारकरी पंढरपूर मध्ये येऊ लागले आहेत. त्याचा परिणाम दिसू लागला असून गेल्या 15 दिवसांत दोन अंकात आलेली येथील कोरोनाची रुग्णसंख्या आजच्या अहवालानुसार 3 अंकी (123 ) झाली आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण वाढ कायम असतानाच 10 पेक्षा कमी आलेली पंढरपूर शहरातील रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांपासून 20 ते 25 पर्यंत वाढली आहे. आजच्या अहवालात ग्रामीण भागात 97 रुग्ण आढळले तर पंढरपूर शहरात 26 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच 3 जनांचा मृत्यू ही नोंदवला गेला आहे.
आषाढी यात्रेला 15 लाखांहून अधिक वारकरी पंढरीत आले असते, त्यामुळे राज्य सरकारने पायी वारीला बंदी घातली तसेच शहर आणि आसपासच्या 10 गावात 5 दिवस संचारबंदी लागू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू होण्यापूर्वीच वारकरी पंढरीत गर्दी करू लागले आहेत. त्याचा परिणाम दिसू लागला असून कोरोनाचे रुग्ण 100 पेक्षा जास्त वाढले आहेत.