शिक्षण,आरोग्य ,रस्ते,पाणी यासाठी मदत करणारच : खरे

पंढरपूर : eagle eye news
मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा लेखाजोगा पहिला असता. केवळ अनगर आणि वडाळा याच दोन गावाचा विकास पाहायला मिळत आहे. याचीच खंत या मतदार संघातील लोकांना दिसून येत आहे. यामुळेच आपण अगोदर पासूनच मागेल त्याला शिक्षण,आरोग्य, रस्ते आणि पाण्यासाठी मदत करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त तारापूर येथील कर्मयोगी माध्यमिक विद्यालय मधील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी १०१ बेंचेसचे वाटप केले आहे. एवढेच नाही तर आपण याच शाळेच्या इमारतीसाठी मोठा निधीही देणार असल्याचे भरीव आश्वासन उद्योजक राजू खरे यांनी दिले आहे.
तारापूर येथील शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम आणि बेंचेसचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभापती दिलीपआप्पा घाडगे, माजी संचालक अभिमन्यू वाघ,सरपंच भारतीताई जगताप, पोहोरगावचे सरपंच बाबासाहेब पाटील, बाजार समिती सदस्य बंडूनाना पवार,यांचेसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपला माणूस म्हणून राजाभाऊचा राहणार अभिमान : प्रणवदादा परिचारक
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणवदादा परिचारक यांनी आपल्या भाषणात मोहोळ विधानसभेचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांचे चांगलेच कौतुक केले. राजाभाऊ हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत.त्यांचे मोठ्या राजकारणी आणि उद्योगपती यांचेशी चांगलेच संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्फत या भागाचा चांगला विकास होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपला पंढरपूर तालुक्याचा माणूस म्हणून आपल्या सर्वांना राजाभाऊ खरे यांचा अभिमान आहे. असे अगदी मनापासून सांगितले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थितामधून दाद मिळाली.
पुढे बोलताना खरे म्हणाले की, मोहोळ विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झालेपासून तीन वेळा विधानसभा निवडणूक झाली. या राखीव मतदार संघातून जाणूनबुजून स्थानिक उमेदवारांना डावलले गेले आहे. त्यामुळे बाहेरील गेटकिन आमदार झाले आहेत.त्यामुळे त्यांना खरा विकास कोणत्या भागात करायला हवा होता. याबाबत बाजूला ठेऊन केवळ आपल्याच भागाचा विकास करून घेतला आहे.त्यामुळे मी आपल्याच मतदार संघातील असल्याने इथल्या समस्या सोडविण्यासाठी निवडणुकीची वाट न पाहता सुरुवात केल्याने , या मतदार संघातील जनता मोठ्या प्रमाणात मला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. विकासाच्या आड राजकारण करत बसू नये. मी मागणाऱ्याच्या नाही तर देणाऱ्याचे यादितला चळवळीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहनही उद्योजक राजू खरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे वेळी मच्छिंद्र पाटील, प्रदीप निर्मळ, श्रीकांत डोळे, संतोष शेळके,गोरख वाघमोडे, समाधान जगताप, हनुमंत सपाटे, मच्छिंद्र नायकुडे, सिद्राम वाघमोडे, मच्छिंद्र सपाटे,अलताब मुलांनी, हणमंत साळुंखे, मुख्याध्यापक दादासाहेब भांनवसे, नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, आंबे येथील सोसायटीचे चेअरमन संभाजी धनवले, गोपाळपूरचे मा. उपसरपंच आरूण बनसोडे, पांडुरंग डोंगरे, मच्छिंद्रमामा मोटे समाधान बाबर, छगन पवार, संजय पवार, नवनाथ कांबळे, रणजित जाधव यांचेसह विटे,पोहरगाव,तारापूर, खरसोली, आंबे, सरकोली,ओझेवडी, फुलचिंचोली, पुळुज, नेपतगाव आदी पंढरपूर तालुक्यातील १७गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.