मुख्यमंत्री स्वतः कार चालवत निघाले पंढरीच्या वारीला

सलग दुसऱ्या वर्षी स्वतः कार चालवत वारी करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले

पंढरपुर : ईगल आय मीडिया

उद्या मंगळवारी (२० जुलै २०२१ रोजी) आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी दोनच्या सुमारास मातोश्री या त्यांच्या निवासस्थानवरुन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री स्वतः कार चालवत पंढरपूर ला निघाले आहेत.

मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. मुख्यमंत्री मध्यरात्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होती. रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मागील वर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले शासकीय पुजेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली होती. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!