अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ना. विजय वडेट्टीवार, माजी खा. राजू शेट्टी पंढरीत

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार पंढरपूर दौऱ्यावर तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी विमानाने सोलापूर येथे येणार आहेत. तिथून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथे जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सोलापूर येथे आढावा बैठक घेऊन विमानाने मुंबईला जाणार आहेत.

त्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे टेम्भुर्णी, करमाळा येथे पाहणीसाठी येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे सोमवारी पंढरपूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेसुद्धा सोमवारीच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

One thought on “अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

  1. पुरग्रस्थाना मदत केली पाहिजे नुसतं पाहण्यात काय अर्थ आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!