उजनी धरणाच्या पाण्यासंदर्भात चौकशी करू : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

महापूर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आल्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी

सोलापूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणातून 14 ऑक्टोबर नंतर सोडण्यात आलेल्या पाण्यासंदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ आणि चौकशी करून कारवाई करू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पत्रकारांनी उजनीच्या पाण्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 10 ऑक्टोबर रोजी धरण 111 टक्के भरलेले होते. हवामान2 खात्याने ईशारा दिल्यानंतरही धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे भीमा नदीला आलेला महापूर नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित असल्याची तक्रार करण्यात आली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, उजनीच्या पाण्या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन पाणी सोडण्याचे नियोजनात काही चूक झाली का याची चौकशी करून तशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी पंढरपुरात पत्रकार परिषदेत उजनीच्या पाणी सोडण्याच्या धोरणावर टीका केली. असून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!