कोरोना वॅक्सिंन कॉकटेल फायद्याचे

Icmr च्या सर्व्हेक्षनाचा दावा

टीम : ईगल आय मीडिया

कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डच्या मिक्स डोसने कोरोनाव्हायरस विरूद्ध चांगले इम्युनिटी पॉवर चांगली वाढते. ICMR च्या मते, अॅडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म लस आणि इनअॅक्टिवेटेड होल व्हायरस व्हॅक्सीनचा मिक्स डोस घेणे सुरक्षित आहे. या दोन लसींचे वेगवेगळे डोस एकाच लसीच्या दोन डोसपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती देतात.ICMR ने देशातील कोरोना मिक्सिंगवर झालेल्या पहिल्या अभ्यासाचे निकाल जाहीर केले आहेत.


कोरोना लस मिक्सिंगचा हा अभ्यास ICMR ने यूपीमध्ये मे-जूनच्या मध्यात केला होता. DGCI च्या तज्ज्ञ पॅनेलने कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या मिश्रित डोसच्या अभ्यासाची शिफारस केली होती. यानंतर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरला देखील लसीच्या मिक्स ट्रायल डोसची परवानगी देण्यात आली होती.


दोन वेगवेगळे लसींचे डोस असतील तर हे जास्त वेळपर्यंत अँटीबॉडी आणि इम्यून रिस्पॉन्स देतील. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीने बनलेल्या व्हॅक्सीन कोरोनाच्या व्हेरिएंटवरही उपयुक्त ठरल्या आहेत.
सप्लाय मर्यादित आहे.पहिला डोस ज्या लसीचा दिला आहे, योग्य वेळी तोच डोस मिळावा हे आवश्यक नाही. ब्लड क्लॉटिंगमुळे जर्मनी, फ्रान्स, यूके आणि कॅनडाने तरुणांवर कोवीशील्डचा वापर बंद केला आहे. अशा वेळी मिक्सिंगची गरज निर्माण झाली.

देशात आतापर्यंत 5 लसींना मान्यता देण्यात आली आहे
जॉनसन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला देशात गेल्या आठवड्यातच आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे. कोवीशील्ड, कोव्हॅक्सीन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना नंतर देशात आपत्कालीन वापराची मान्यता मिळवणारी जॉनसन अँड जॉन्सन ही 5 वी लस आहे.

ऑक्सफोर्डमध्ये झालेल्या Com-COV अभ्यासात, व्हॅक्सीन मिक्सिंगने अँटीबॉडी जास्त बनल्या आणि इम्यून रिस्पॉन्स चांगला राहिल्याचे समजले आहे. काही लोकांना सौम्य साइडइफेक्ट्सही दिसले, पण वैज्ञानिकांनी म्हटले की, हे शॉर्ट टर्म साइड इफेक्ट मजबूत इम्यून सिस्टमची निशाणी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!