जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पंढरपूरमधील गुजराती कॉलनीला भेट
पंढरपूर : eagle eye news
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनीला भेट देवून सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदींसह मेहतर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कुमार आशीर्वाद म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरावर मार्ग निघणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पुर्ण करण्यात येतील. शासनस्तरावरील मागण्याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा करुन त्या पुर्ण करण्यात येतील. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सफाई कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करुन देण्याच्या मागणीबाबत सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी मांडणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
यावेळी गुरु दोडीया यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच मागण्याबाबतची माहिती देवून त्या तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी केली.
यावेळी नगर पालिका प्रशासनाकडून गुजराती कॉलनीत सफाई कर्मचाऱ्यांचे घरावरील बदलले पत्रे, शौचालय व्यवस्था व दुरुस्ती आदीची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, अमित माळी, तहसिलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, उपमुख्यधिकारी सुनिल वाळुंजकर, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर तसेव सफाई कर्मचारी उपस्थित होते.