‘माझे कुटुंब माझी -जबाबदारी’ याबाबत दिली शपथ
पंढरपूर : ईगल आय मीडिया
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ‘ माझे कुटुंब -माझी जबाबदारी ‘ या मोहिमेची सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तुंगत तालुका पंढरपूर येथे भेट देऊन कामाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी, कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची ही काळजी घेतली पाहिजे असे आवाहन करीत ,सर्वांना याबद्दल प्रतिज्ञाद्वारे शपथ दिली.
तसेच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या कार्याचा आढावा घेत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची तपासणी केली जाते की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या विषयाचे गांभीर्य ओळखून संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले ,सरपंच आगतराव रणदिवे यांनीही विचार व्यक्त केले .याप्रसंगी तहसीलदार वैशाली वाघमारे , गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. श्रीकांत नवत्रे डॉ.रणजीत रेपाळ,उपसरपंच वैशाली लामकाने, तुंगत उपकेंद्राच्या सेविका अरुणा पाटेकर,ग्रामसेवक एस एम चेंडगे, तलाठी आर ए शिंदे ,आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक, ग्रामपंचायत सदस्य पंडित देठे,वामन वनसाळे ,औदुंबर गायकवाड ,ग्रामपंचायत, आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.