काँग्रेसचे दिग्गज नेते विलासकाका उंडाळकर यांचे निधन

कराड – कोयनेच्या खोऱ्यातील राजकीय,सामाजिक, तत्वनिष्ठ समृद्धी हरपली

टीम : ईगल आय मीडिया

सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत आणि दिग्गज नेते माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील – उंडाळकर याचे आज पहाटे सातारा येथे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कराड -कोयना खोऱ्यातील एका दिग्गज राजकीय पर्वाचा अस्त झाला असून जिल्हा काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.

कराड तालुक्यातील मूळचे उंडाळे गावचे रहिवासी असलेल्या विलासकाकांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे 35 वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस विचाराशी निष्ठा बाळगली. मागील 8 वर्षात ते काँग्रेस पासून दूर असले तरी त्यांनी अपक्ष राहून राजकारण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पावर यांच्या जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाला वेसण घालणारे, त्यांना आव्हान देणारे नेते अशीही त्यांची ओळख होती.

मागील काही दिवसांपासून विलासराव पाटील-उंडाळकर यांचे प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

1967 झाली सातारा जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केल्यानंतर गेली पाच दशके ते जिल्हा बँकेवर संचालक पदी होते. त्यानंतर त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग 35 वर्ष त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमण झालेले असताना काकांनी कराड मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व ठळकपणे दाखवून देत जिल्ह्यातील काँग्रेस ला उभारी दिली होती. आपल्या जनसंपर्क आणि कार्य कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला होता.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कडून लढताना विलासकाकांचा पराभव केला होता. नुकतेच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जुळवून घेत राष्ट्रीय काँग्रेस बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढवत असतानाच विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!