काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणूक प्रचारात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस आय पक्षानेही पूर्ण ताकदीनिशी उडी घेतली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महिला आघाडीच्या नेत्या सौ.सुनेत्रा ताई पवार, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रितपणे निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत असली तरी अपक्षांनीही प्रचारात चांगलीच रंगत आणली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकिय वातावरण तापलेले आहे. मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी असली तरी भाजप विरोधात महाविकास आघाडी एकजुटीने लढत असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी चे आम. भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस, पिरिप, प्रहार संघटना, शेकाप चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेने या पोटनिवडणूकीत बंडखोरी केली म्हणून महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांना पक्षातून काढून टाकले आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, सोलापूर विभागाचे प्रमुख गणेश वानकर, जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक दोन्ही तालुक्यात पहिल्या दिवसांपासून आघाडीवर आहेत.

त्याच बरोबर काँग्रेस पक्षानेही निवडणूक प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ.प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (पाणीवकर), पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, महिला आघाडीच्या नेत्या सुनेत्रा ताई पवार, मंगळवेढा तालुकाअध्यक्ष ऍड.नंदकुमार पवार, जेष्ठ नेते शिवाजीराव काळूनगे यांनी प्रचारात उडी घेतली आहे. महाविकास आघाडी एकजुटीने पोटनिवडणूकीत उतरल्याने भाजप समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथीलश्रीपतराव कदम यात्री निवास येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि सौ सुनेत्रताई पवार यांनी केले. यावेळी उमेदवार भगीरथ भालके यांच्यासह महिला आघाडीच्या नेत्या डॉ.साधनाताई उगले, युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, शहराध्यक्ष ऍड. राजेश भादुले, माजी शहराध्यक्ष नागेश गंगेकर, आशाताई बागल, ओबीसी सेलचे समीर कोळी, अमर सूर्यवंशी, दत्तात्रय बडवे, राजाभाऊ उराडे,संदिप पाटिल, नितीन शिंदे, सुहास भाळवणकर, अशफाक सय्यद , मिलिंद अढवळकर, पिंटू भोसले, मिलिंद मोलाने, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, गणेश माने, संदिप शिंदे. बाळासाहेब आसबे, अजय गंगेकर, समाधान रोकडे, राजश्री लोळगे, मधुकर फलटणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!