श्री संत नामदेव महाराज पायरीचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले शुद्धीकरण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर व नामदेव पायरी पवित्र स्थळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या व वारकरी संप्रदायाच्या सर्व भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आज काँग्रेस पक्षा कडुन श्री संत नामदेव महाराज पायरी व मंदीर परिसर पंचामृताने व गोमुत्राने शुधीकरण करण्यात आले.

संबंधित बातमी वाचा !

या वेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबिसी सेल अध्यक्ष काँग्रेस समिर कोळी, युवक जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, जिल्हा सरचिटणीस हणमंत मोरे, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष अशपाक सय्यद, युवक कार्याध्यक्ष सागर कदम, मा.शहर अध्यक्ष सुहास भाळवणकर, शहर सरचिटणीस मिलिंद अढवळकर, बाळासाहेब आसबे, भाऊ तेलंग व सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.


दोन दिवसंपूूरवी संत नामदेव महाराज समाधी जवळ भाजपचे कार्यकर्तानीं चपला व बूट घालून कठडे ओलांडुन धुडगूस घातला. मीडियावर झळकण्यासाठी कार्यकर्त्यांनी संत नामदेव महाराज पायरीवर चपला बूटा सहित भान विसरून, वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याच्या ऐवजी, भाजप चिन्ह असलेले झेंडे घेऊन, घोषणा देत धुडगुस घातला. व श्री विठ्ठल मंदीराच्या प्रवेशद्वारावर झेंडे फडकले.

त्यामुळे भावना दुखावल्याचे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज संत नामदेव समाधी स्थळ परिसर आणि प्रवेशद्वाराजवळ गोमूत्र आणि पंचामृत शिंपडून, फुले वाहून शुद्धीकरण करण्यात आले. त्याचबरोबर भाजप पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि आमदारानी जाहीर माफी मागावी अन्यथा सोलापूर ओबीसी विभाग व सर्व काँग्रेस कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील. असाही ईशारा यावेळी दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!