जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे संविधान दिन साजरा

संविधानाचे पालन करणे आपले कर्तव्य ; न्याय. एम. बी. लंबे

पंढरपूर : ईगल आय न्यूज

भारतीय संविधान अत्यंत कष्टातून आणि त्यागातून निर्माण झाले आहे. संविधानाचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे प्रमाणिकपणे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. बी. लंबे यांनी केले. जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे शनिवार, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२२ रोजी तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजत कार्यक्रमा दरम्यान हे बोलत होते.

कार्यक्रम प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करुन, न्यायाधीश, विधीज्ञ, विधीस्वयंसेवक व न्यायालीन कर्मचारी समवेत सामुहिक संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर न्यायाधीश श्री. ए. ए. खंडाळे व श्रीमती एस. ए. साळुुंखे यांनी संविधानाचे महत्व विशद केले.


सदर कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. के. मोरे, सह. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ए. ए. खंडाळे, सह दिवाणी न्यायाधीश ए. आर. यादव, न्या. श्रीमती टी. जी. बन्सोड, न्या. श्रीमती आर. जी. कुंभार, न्या. श्रीमती एस. ए. साळुखे, अधिवक्ता संघाचे सचिव राहुल बोडके तसेच बहुसंख्य वकील वर्ग न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार, विधी सव्यंसेवक उपस्थित होते पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. भगवान मुळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. एम. एम. नाईकनवरे, यांनी केले. तर आभार प्रदर्शन पंढरपूर अधिवक्ता सदस्य ऍड. महेश कसबे यांनी केले

Leave a Reply

error: Content is protected !!