सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कोरोनाग्रस्त

खा. नवनीत कौर -राणा यांची प्रकृती सुधारली

टीम : ईगल आय मीडिया
राज्याचे सहकार व पणनमंत्री आणि कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांना कोरोनाचा संसर्ग असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

उद्धव ठाकरे सरकार मधील कोरोना बाधित झालेले ना पाटील हे चौथे मंत्री आहेत. या पूर्वी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनाही कोरोना झाला होता आणि त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


खा. नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा आय सी यु तुन बाहेर
अरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आता एकदम सुधारली असून त्यांना अति दक्षता विभागातून बाहेर काढले आहे. खा राणा यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील १० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्या सर्वांवर नागपूर, अमरावती येथे उपचार सुरु आहेत. खा राणा यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना मुबंईला हलवण्याच्या सूचना केली होती. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी खा. राणा यांनी ट्विट करून तुमच्या प्रार्थनेमुळे मी सुखरूप असल्याचे कळवले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!