राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

वाढत्या कोरोनाचा परिणाम

राज्याच्या सहकार विभागाने काढलेला आदेश

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याच्या सहकार विभागाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31मार्च अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भात आजच ( दि.24 फेब्रुवारी ) राज्याच्या सहकार विभागाने आदेश काढला आहे.

त्यानुसार 250 पेक्षा जास्त सभासद असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका 31 मार्च 2021पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 2 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकी बाबत काढलेला आदेश रद्द केला आहे.

कोरोनाचा वाढत असलेला कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी सहकार आणि पणन विभागाने आज आदेश काढून 31 मार्च अखेरीस सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!