राज्यात कोरोना कंट्रोलमध्ये !

राज्याचा बरे होण्याचा वेग 91 टक्केपर्यंत वाढला

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ६० करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार ३४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हा ९१.३५ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात ५ हजार २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज १६१ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका झाला आहे, आजपर्यंत १७ लाख १० हजार ३१४ लोक पॉझिटिव्ह आले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्या राज्यात १० लाख ५९ हजार ४९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ८ हजार ८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत . राज्यात सध्या १ लाख २ हजार ९९ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ५ हजार २७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १७ लाख १० हजार ३१४ इतकी झाली असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!