मंगळवेढा शहरात कोरोनाचा शिरकाव


गुरुवारी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला

मंगळवेढा : ईगल आय मीडिया
आजवर कोरोना फ्री असलेल्या मंगळवेढा शहरात शेवटी कोरोना चा शिरकाव झाला आहे. गुरुवारी शहरात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तो परिसर कंटेनमेंट झोन करण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा कामास लागलेली आहे.

4 दिवसांत  तालुक्यातील  पाटखळ पाठोपाठ बोराळे येथे रूग्ण आढळून आला व त्यानंतर मंगळवेढा शहरात कोरोना घुसल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे.
    गेल्या 4 महिन्यापासून मंगळवेढा शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी  पोलिस प्रशासन,नगरपालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणा दक्ष होती. दरम्यानच्या काळात पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे हे आजारी पडल्याने रजेवर गेले असून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचीही नुकतीच बदली झाल्याने आता कोरोनाचे संकट आल्याने प्रशासकीय यंत्रणेचा ताण वाढणार आहे.
   एका साखर कारखान्यात कामगार असलेल्या या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कारखाना परिसर सतर्क झाला आहे. तसेच तो शहरात ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरातील त्याचे संबंधित असणार्‍यांना व त्याचे कुटुंबियांना क्वारंटाईन केले असून त्यांची रवानगी मंगळवेढयातील संस्थात्मक विलगीकरणामध्ये करण्याचे काम सुरु झाले आहे.
दरम्यान,  रुग्ण आढळल्यानंतर तीन कि.मी.चा परिसर सील करण्यात येतो. त्यामुळे शुक्रवारी मंगळवेढा शहर व परिसरातील दुकाने बंद राहणार की सुरु राहणार याबाबत व्यापारी व नागरिकांतून संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने याबाबत त्वरीत निर्णय जाहिर करावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!