बुधवारी वाढले 46 पॉझिटिव्ह
7 कुटुंबातील 36 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, तालुक्यातील बाधितांची संख्या 500 च्या उंबरठ्यावर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आता कोरोना शहराच्या गल्ली बोळात आणि घरा घरात ठाण मांडून बसत असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी शहरातील आलेल्या पॉझिटिव्ह अहवालांपैकी तब्बल 36 रुग्ण 7 कुटुंबातील आहेत. त्यातील जुनी पेठ येथील एकाच कुटुंबातील 11 जणांचा समावेश आहे. तर अन्य बहुतांश रुग्णसुद्धा एकाच कुटुंबातील असल्याचे समोर येऊ लागले आहे. सामाजिक अंतराची मर्यादा ओलांडून कोरोना घरा घरात घुसल्याने अधिक भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी पंढरपूर शहरातील 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यासह शहर व तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 500 च्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. 499 एवढी झाली आहे.
बुधवारी प्राप्त अहवालानुसार
शहरात नवीन 46 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आजच्या अहवालात सर्वाधिक रुग्ण एकाच कुटुंबातील असून जुनी पेठ येथील एकाच कुटुंबातील 11 जण बाधित झाले आहेत.
त्याच बरोबर शहरात राम बाग रोड येथील एका कुटुंबातील 5, झेंडे गल्लीत एकाच कुटुंबातील 6, घोंगडे गल्ली एकाच कुटुंबातील 4 बँकट स्वामी मठाजवळील एकाच कुटुंबातील 3,याच परिसरातील अन्य एका कुटुंबातील 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
तर शहरातील भीमशक्ती चौक, संतपेठ, गांधी रोड, वृंदावन हौसिंग सोसायटी, जुनी पेठ या भागात हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवार एकूण 46 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत तर यापूर्वी शहर व तालुक्यातील रुग्णांची संख्या 453 झाली आहे. त्यामुळे एकून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 499 एवढी झाली आहे.
यापैकी 192 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर वाखरी कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय,जनकल्याण हॉस्पिटल तसेच सोलापूर, पुणे या ठिकाणी मिळून 253 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.