राज्यात सर्वाधिक 31 त 40 वयोगटातील ( 21.34 टक्के ) रुग्ण
टीम : ईगल आय मीडिया
राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत नसली तरी त्यापेक्षा चिंताजनक बाब समोर आली आहे की, वृद्धांच्या तुलनेत राज्यात तरुणांना कोरोना जास्त प्रमाणात घेरतो आहे. राज्यातील 31 ते 40 वयोगटातील 21.34 टक्के रुग्ण आहेत. तर ५१ ते ६० या वयोगटातील रुग्णांचं प्रमाण १५.९५ टक्के इतकं आहे. यावरून तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.
राज्यात सध्या कोरोनाचे एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. मात्र, अनलॉकनंतर दुसऱ्या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे.
लॉकडाउनच्या काळात ४१ ते ५० आणि ५१ ते ६० या वयोगटातील व्यक्तींना करोना संसर्गाचं प्रमाण जास्त होतं. मात्र लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात ३१ ते ४० वयोगटातील करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. सध्या राज्यात याच वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ३१ ते ४० वयोगटातील रुग्णसंख्या २१.३४ टक्के आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या माहितीप्रमाणे ४ जून रोजी या वयोगटातील रुग्णसंख्या २०.५४ टक्के इतकी होती. त्यानंतर ती वाढत गेली.
३१ ते ४० वयोगटानंतर राज्यात ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्येचा क्रमांक लागतो. या वयोगटातील रुग्णसंख्या १७.९ टक्के इतकी आहे. त्यानंतर २१ ते ३० या वयोगटातील रुग्णसंख्या १६.९८ टक्के इतकं आहे. तर ५१ ते ६० या वयोगटातील रुग्णांचं प्रमाण १५.९५ टक्के इतकं आहे.एकंदरीत आकडेवारी पाहिल्यानंतर राज्यात 31 ते 40 वर्षे वयोगटातील युवकांना कोरोनाची लागण अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसते.