कोरोना कंट्रोल : रुग्ण संख्येत घट ; राज्याला दिलासा !

टीम : ईगल आय मीडिया

 राज्यात सोमवारी सलग 3 ऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागला आहे. सोमवारी राज्यात ३ हजार ८३७ नवीन रुग्ण सापडले आहेत तर, ८० बाधितांचा करोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सोमवारी ४ हजार १९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, ३ हजार ८३७ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, सध्या कोरोना बाधितांची संख्या १८ लाख २३ हजार ८९६ इतकी झाली आहे. तर, १६ लाख ८५ हजार १२२ जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात आज ८० रुग्ण दगावले असून सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५९ टक्के इतका आहे.

राज्यात दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही स्थिर होते. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र मागील 3 दिवसांपासून ही संख्या घटत आहे.सोमवारी बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढल्यानं किंचितसा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सध्या ९० हजार ५५७ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रिकव्हरी रेट आता ९२.३९ टक्के इतका झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!