45 वर्षांचा संसार : एकाच दिवशी पती पत्नीचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

गेल्या 45 वर्षांपासून संसाराचा गाडा एकत्रित ओढणाऱ्या पती पत्नीला एका पाठोपाठ हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा एकाच दिवशी काही वेळच्या अंतराने मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात ही दुर्घटना घडली असून सिद्रामप्पा आणि ललिता इटले असं त्या पती पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकूळ वातावरण आहे.

उस्तुरी ( ता.निलंगा जिल्हा लातूर ) इथे सिद्रामप्पा आणि ललिता इटले हे वृद्ध दाम्पत्य राहत होते. सिद्रामप्पा यांना शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुःखात बुडालेल्या पत्नी ललिता यांनादेखील काही वेळाने हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

सिद्रामप्पा आणि ललिता यांनी 45 वर्ष सुखाने संसार केला. या दाम्पत्याला चार विवाहित मुले आणि नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे. एकाच दिवशी पती-पत्नीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. पती-पत्नीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!