पसार परमविरसिंग यांचा पाय खोलात

कोर्टाचे दुसऱ्यांदा अजामीनपात्र अटक वॉरंट

टीम : ईगल आय मीडिया

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात कोर्टाने शनिवारी दुसरे अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले आहे. त्यामुळे परमविरसिंग यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने परमबीर सिंग बेपत्ता असल्याप्रकरणी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर काल मुंबईच्या किल्ला कोर्टाने ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात देखील आरोप झाले. त्यावरून ठाणे कोर्टाने देखील परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते.

परमबीर सिंग यांच्यासोबतच विनय सिंह आणि रियाज भाटी विरोधात ही अजमीनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आले आहे. खंडणी वसूली प्रकरणात चौकशीसाठी परमबीर सिंह सापडत नसल्याने क्राइम ब्रांचने क्राइम ब्रांचने कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!